अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Updated: June 18, 2014 05:19 IST2014-06-18T05:19:47+5:302014-06-18T05:19:47+5:30

दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केले आहे

Announcement of eleven online admission schedule | अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केले आहे. यानुसार १८ ते २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज सादर करता येतील. पहिली गुणवत्ता यादी २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. या प्रवेशाचे वेळापत्रक मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी जाहीर केले. दहावी परीक्षा झाल्यानंतर अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून ठेवला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा दुसरा भाग भरायचा असून, विद्यार्थ्यांना १८ ते २५पर्यंत अर्ज सादर करता येईल. अर्जात काही त्रुटी असल्यास त्या २६ जूनपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत दुरुस्त करता येणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यातील प्रवेश संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर १८ ते २७ जूनपर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. या कोट्यांमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तसेच २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अल्पसंख्याक कोट्यातील रिक्त आणि इनहाउस कोट्यातील शिल्लक जागा महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रवेशासाठी आॅनलाइन सादर कराव्यात, असे आवाहन शिक्षण उपसंचालकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Announcement of eleven online admission schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.