शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांमध्ये वनपट्टे आदिवासींच्या नावे करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:33 IST

वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : वनपट्टे नावावर करण्याबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याने हजारो शेतकरी-आदिवासी यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला.वनपट्टे नावावर करण्यासह विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लोकसंघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह अनेक नेते घोषणा देतच विधान भवनात गेले.राज्यात सुमारे २,३१,००० वनपट्ट्यांची प्रकरणे असून त्यापैकी फक्त १ लाख ३० प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित वनपट्टे तातडीने नावावर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर तीन महिन्यांत प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्य सचिवांची समिती त्याचा आढावा घेईल, असेही ते म्हणाले.वनपट्टे नावे नसल्यामुळे आदिवासींना दुष्काळी भरपाई मिळालेली नाही. त्यांनाही भरपाई मिळावी ही मागणी तत्त्वत: मान्य करत पात्र शेतकºयांना लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.खावटी कर्ज माफ करतानाच भविष्यात ही रक्कम अनुदान स्वरूपात देण्याची मागणीही मान्य झाली. पेसा कायद्याबाबत एक महिन्यात आढावा घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. बैठक सकारात्मक झाली तरी सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे प्रतिभा शिंदे म्हणाल्या. त्यामुळे शिष्टमंडळ मुख्य सचिवांकडे गेले. तिथे संध्याकाळी लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यासाठी शिष्टमंडळ आझाद मैदानाकडे रवाना झाले....तर पुन्हा धडक देणारलोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव प्रतिभा शिंदे म्हणाल्या, मोर्चातील शेकडो शेतकरी आजारी पडले. पायाला फोड व अंगात ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. सरकारवर विश्वास नसला, तरी मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे आम्ही मुंबई सोडण्याचे ठरवले आहे. लेखी आश्वासन पाळले नाही, तर तीन महिन्यांनी थेट मंत्रालयावर आदिवासी शेतकरी धडक देतील.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरी