अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30

मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी जाहीर केले.

Announce the eleventh admission schedule | अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर


मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सोमवारी जाहीर केले. या वेळापत्रकानुसार ७ जून ते १३ जुलै दरम्यान आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल.
आॅनलाईन अर्ज शाळेतून सादर करावेत, असे आवाहन कार्यालयाने केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ १६ मेपासून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती माहितीपुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. शिवाय मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतील ग्रेडचे गुणांत रूपांतर करण्यासाठी चार केंद्रांची उभारणी केल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)
>आॅनलाईन प्रवेश अर्ज
सादर करणे - ७ ते १७ जूनदरम्यान
अर्जातील त्रुटी दुरूस्ती
- २१ व २२ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत)
>प्रथम गुणवत्ता यादी
घोषित करणे - २७ जून (सायंकाळी ५ वाजता)
यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - २८ ते ३० जून (सकाळी १० ते दुपारी ३)
>द्वितीय गुणवत्ता यादी घोषित करणे - ४ जुलै (सायंकाळी ५ वाजता)
यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - ५, ७ व ८ जून (सकाळी १० ते दुपारी ३)
तृतीय गुणवत्ता यादी
घोषित करणे - ११ जुलै (सायंकाळी ५ वाजता)
यादीतील विद्यार्थ्यांचे शुल्क स्वीकारणे - १२, १३ जुलै (सकाळी १० ते दुपारी ३)
>अल्पसंख्याक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश - संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ७ ते २१ जून (दुपारी १ वाजेपर्यंत) या कालावधीत पूर्ण केले जातील. तर या कोट्यातील शिल्लक जागा आॅनलाईन प्रवेशासाठी २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाईन सादर होतील.

Web Title: Announce the eleventh admission schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.