अण्णाभाऊ साठे घोटाळा तब्बल ३८५ कोटींचा!
By Admin | Updated: June 5, 2015 01:53 IST2015-06-05T01:53:21+5:302015-06-05T01:53:21+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळा तब्बल ३८५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही.

अण्णाभाऊ साठे घोटाळा तब्बल ३८५ कोटींचा!
१३२ कोटी रुपयांची खैरात : या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही
यदु जोशी - मुंबई
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळा तब्बल ३८५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप पोलिसांनी एकालाही अटक केलेली नाही.
राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील आमदार रमेश कदम हे या महामंडळाचे अध्यक्ष असतानाच्या काळात हा घोटाळा झाला आहे. कदम यांनी स्वत: अध्यक्ष असलेल्या कारखान्यांना महामंडळातून थेट १३२ कोटी रुपयांची खैरात वाटली.
आकडेवारी अशी :
जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था; बोरीवली या संस्थेस १ नोव्हेंबर २०१३ रोजी (चेक क्र. ७४१२६३) २४ कोटी रुपये दिले गेले. २ नोव्हेंबर २०१३ रोजी (चेक क्र. ७४१२६६) १० कोटी देण्यात आले. २७ मार्च २०१४ रोजी (चेक क्र. ७४१७०५)
५ कोटी रुपये दिले गेले. १०
नोव्हेंबर २०१४ रोजी (चेक क्र. ७२८७४७) तब्बल २० कोटी रुपये देण्यात आले.
आता दुसरे उदाहरण - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय सूतगिरणी पैठण; जि. औरंगाबाद यांना २८ जुलै २०१४ रोजी ५२ कोटी ७८ लाख ७७ हजार रुपये (चेक क्र. ७२८६८४) तर ४ आॅगस्ट २०१४ रोजी (चेक क्र. ७२८७९९) ८ कोटी ९५ लाख २३ हजार रुपये देण्यात आले. मैत्रिय शुगर असोसिएशन; वैजापूर जि. औरंगाबाद यांना १६ आॅक्टोबर २०१४ रोजी चेक क्र. ७२८७४२द्वारे ३० कोटी रुपये दिले.
आता हे बघा - २०१४-१५ या एकाच वर्षात ९ कोटी १५ लाख ५० हजार ३६६ रुपये किमतीच्या ५७ जणांना ५७ महागड्या गाड्या राज्यातील काही व्यक्तींना नियमबाह्यरीत्या वाटण्यात आल्या. त्यासाठी कोणतीही योजना नव्हती. या महनीयांना देण्यात आलेल्या गाड्यांची किंमत प्रत्येकी ८ लाख ते २० लाख रुपयांच्या घरात होती.
यांना वाटल्या महागड्या गाड्या : वामन सावदास खंडाळे (नाशिक), प्रवीण रावसाहेब भारस्कर, सुनील रामचंद्र उमाप, अशोक भाऊसाहेब रोकडे (अहमदनगर), रोहिदास विलास साळुंके, आनंद अशोक कांबळे (पुणे), संतोष कृष्ण जाधव (बारामती), मच्छिंद्र ज्ञानू सकटे (सातारा), बाळासाहेब प्रभाकर साठे, दिलीप नामदेव देवकुळे, कल्याण सौदागर मोरे, किशोर अशोक कांबळे, पांडुरंग गोविंद कदम, सुनील सुभाष चव्हाण, रवींद्र महादेव वाघमारे, धनाजी ज्ञानदेव वाघमारे (सगळे जि. सोलापूर), सुरेश एकनाथ फाजगे, धर्मराज तुकाराम मिसाळ, सुभाष नागोजी मिसाळ, संभाजी माधवराव संभाळकर, शिवाजी रामभाऊ घोडके, लहू नामदेव सरोदे, कडुबा सुंदरलाल मावस (सर्व जि. औरंगाबाद), संजय नारायण कांबळे, राजेंद्र गणेश थोरात, कैलाश रामदास पाजगे, योगिराज तुकाराम मिसाळ (सर्व जि. जालना), बाबा एस. सुतार, विजय सूर्यभान साठे, रामेश्वर केरू घोरपडे, दीपक इंदर थोरात, शरद यादव लोखंडे, सुमित्रा नाना थोरात, संतोष वैजनाथ पाटोेळे, राम धर्मराज जोगदंड, बाबू यशवंत गायकवाड, एकनाथ आव्हाड (सर्व जि. बीड), रमेश हरीभाऊ आमटे (अमरावती).
यांना वाटल्या महागड्या गाड्या
संतोष नागनाथ कदम, संजय दीपक साठे, विजय रामकृष्ण कसबे, व्यंकट महादू शिंदे, सतीश वाघमारे, सचिन बाळू साळवे, नामदेव बाळू खलसे, राजेंद्र दत्तात्रय गायकवाड, भारत ज्ञानदेव गायकवाड, दशरथ विनोद कसबे, उत्तम हनुमंत खंडागळे, दिलीप चंद्रकांत खंदारे, सोमनाथ गोरख खिलारे, प्रवीण बबन कारके, राम महादू शिंदे, पद्माकर बाबूराव सूर्यवंशी, त्रिमुख बाबू खलसे, गणपत नरसिंग वाघमारे, गोरख मनोहर साठे (सगळे रा. वांद्रे; मुंबई).
याशिवाय, कर्मचारी भरती, रमेश कदम यांच्या नातेवाइकांनी उचललेले पैसे, बोगस कर्जवाटपाची हजारो प्रकरणे, अधिकाऱ्यांनी केलेली कोट्यवधी रुपयांची उचल अशी अनेक मती गुंग करणारी प्रकरणे आहेतच. हे सगळे घोटाळे ३८५ कोटींच्या घरात जातात.