तर मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे आंदोलन
By Admin | Updated: March 29, 2017 20:07 IST2017-03-29T18:45:43+5:302017-03-29T20:07:57+5:30
केंद्र सरकारने लोकपाल नियुक्ती न केल्यास पुन्हा रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे.

तर मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे आंदोलन
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 29 - केंद्र सरकारने लोकपाल नियुक्ती न केल्यास पुन्हा रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिला आहे. अहमदनगर येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याची सरकारची इच्छा नाही, हा जनतेच्या भावनांचा अपमान असून लोकपालसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे. असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत.
सरकारी कामासाठी आजही पैसे द्यावे लागतात. मोदींनी भ्रष्टाचार संपवण्याचं आश्वासन निवडणुकीत दिलं होतं. त्याचा त्यांना विसर पडला आहे, अशा तीव्र शब्दात अण्णा हजारेंनी केंद्र सरकारवर टीका केली. लवकरच पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आंदोलनाची तारीख जाहीर करेन,' असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.