अहमदनगर - मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल विमान करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यापासून केंद्रीय राजकारण ढवळून गेले असून, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. राफेल प्रकरणाचा आपण अभ्यास करत असून, याबाबतचे सत्य मी जनतेसमोर आणेण अशी घोषणा, अण्णा हजारे यांनी लोकमतशी बोलताना केली आहे. लोकपाल कायद्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे येत्या 30 जानेवारीपासून आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकमतच्या नगर आवृत्तीचे प्रमुख सुधीर लंके यांनी आज अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी सध्या गाजत असलेल्या राफेल विमान करार प्रश्नी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अण्णा हजारे म्हणाले की, ''सध्या राफेलबाबत एवढी चर्चा होत आहे, तर तुम्ही कारवाई का नाही करत? जर सरकारकडे विचारणा होत असेल तर त्यांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. हा सूर्य आणि हा जयद्रथ असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आता मीसुद्धा या प्रकरणाचा अभ्यास सुरू केला आहे. मी हवेत बोलणार नाही. मात्र पूर्ण अभ्यास कडून सत्य जनतेसमोर मांडेन.''
राफेल प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणणार, अण्णा हजारेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:32 IST
राफेल विमान करारातील भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली विरोधीपक्षांकडून केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहे.
राफेल प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणणार, अण्णा हजारेंची घोषणा
ठळक मुद्दे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही राफेल प्रकरणामध्ये उडी घेतली आहेराफेल प्रकरणाचा पूर्ण अभ्यास कडून सत्य जनतेसमोर मांडेन, अण्णांची घोषणालोकपालसाठी 30 जानेवारी 2019 पासून पुन्हा करणार आंदोलन