देशात अण्णा हजारे केंद्र
By Admin | Updated: July 8, 2016 01:32 IST2016-07-08T01:32:14+5:302016-07-08T01:32:14+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर पुन्हा देशभर जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट

देशात अण्णा हजारे केंद्र
पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर पुन्हा देशभर जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला आहे. त्यासाठी १५ राज्यात अण्णा हजारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. गुरूवारी राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हजारे यांनी रामलीला मैदान, जंतरमंतर येथे जनलोकपालसाठी आंदोलन केल्यानंतर देशभरात अण्णांच्या नावाचा महिमा सुरू होता. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना कार्यरत केली होती. जनलोकपालची अंमलबजावणी, ग्रामसभेला कायद्याने अधिकार व निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह हद्दपार करणे यासाठी लढा देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
अण्णांनी दिला तीन महिन्यांचा अवधी
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ च्या कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी व जनजागरण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. सगळीकडे संघटन उभारल्यानंतर अण्णा प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत.