...तर केजरीवालांविरोधात आंदोलन करणार- अण्णा हजारे

By Admin | Updated: September 8, 2016 14:23 IST2016-09-08T14:01:32+5:302016-09-08T14:23:29+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे

Anna Hazare to campaign against Kejriwal ... - Anna Hazare | ...तर केजरीवालांविरोधात आंदोलन करणार- अण्णा हजारे

...तर केजरीवालांविरोधात आंदोलन करणार- अण्णा हजारे

style="text-align: justify;">-ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 8 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि एकेकाळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जर मला आम आदमी पक्षाविरोधात किंवा त्यांच्या मंत्र्यांविरोधात भक्कम पुरावे मिळाले तर केजरीवाल यांच्याविरोधात राजधानी दिल्लीत आंदोलन करेन असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. बुधवारी राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी अण्णा हजारे बोलत होते.
 
स्वतः अरविंद केजरीवालांबाबत आपल्याला कोणतीही शंका नसल्याचं यावेळी अण्णांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांच्या पक्षातील काही व्यक्तिंमुळे आणि गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा खराब झाल्याचं अण्णा बोलले. जर लोकांचा गमावलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर केजरीवालांनी सत्ता सोडावी आणि पुन्हा देशसेवा करावी असा सल्लाही अण्णा हजारेंनी यावेळी दिला. 
 
केजरीवालांचा पक्ष लोकांचा विश्वास जिंकेल, असं मला वाटत होतं. पण गेल्या काही दिवसात आपच्या नेत्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे माझा अपेक्षाभंग झाल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली. 
 

Web Title: Anna Hazare to campaign against Kejriwal ... - Anna Hazare