अण्णा भाऊंचा साहित्य गौरव
By Admin | Updated: June 23, 2014 04:17 IST2014-06-23T04:17:17+5:302014-06-23T04:17:17+5:30
जे जगतो तेच मी लिहितो’ असे सांगणारे आणि आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या जीवनसंघर्षाची मशाल पेटविणारे सामान्य प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊंचा साहित्य गौरव
नाशिक : ‘जे जगतो तेच मी लिहितो’ असे सांगणारे आणि आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या जीवनसंघर्षाची मशाल पेटविणारे सामान्य प्रतिभावंत साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यप्रसारासाठी आता महाराष्ट्र शासन पुढे सरसावले आहे. अण्णांचे समग्र वाङ्मय ग्रंथ स्वरूपात प्रकाशित करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. अण्णांचे समग्र वाङ्मय व त्यांचे अद्ययावत व सप्रमाण चरित्र हिंदी-इंग्रजी भाषांमध्ये आणण्याचा संकल्प उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोडला आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या ४५ कादंबऱ्या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, सात चित्रपटकथा यांसह असंख्य लावण्या व पोवाडे अशी बहुविध साहित्यसंपदा आहे. जगातील व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले, तर त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीच्या सुमारे १६ आवृत्त्या निघाल्या आहेत. १९४९ साली ‘मशाल’ या साप्ताहिकातून ‘माझी दिवाळी’ कथा लिहून साहित्यप्रवासाला सुरुवात केली. (प्रतिनिधी)