‘लोकायुक्ता’साठी अण्णा आग्रही
By Admin | Updated: November 9, 2014 02:11 IST2014-11-09T02:11:10+5:302014-11-09T02:11:10+5:30
राज्यात सक्षम ‘लोकायुक्त’ येणो गरजेचे असून, यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्यावतीने राज्यभर लढा उभारण्यात येणार आहे.

‘लोकायुक्ता’साठी अण्णा आग्रही
पारनेर (जि़ अहमदनगर) : राज्यात सक्षम ‘लोकायुक्त’ येणो गरजेचे असून, यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्यावतीने राज्यभर लढा उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच दौ:याला प्रारंभ करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे शनिवारी जाहीर केले.
भष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यातील कार्यकत्र्याचे तीन दिवशीय अभ्यास मार्गदर्शन शिबिराला राळेगणसिद्धी येथे प्रारंभ झाला़ त्यावेळी हजारे बोलत होत़े
हजारे म्हणाले, जनशक्तीच्या दबावातून अनेक वर्षे रखडलेले लोकपाल बील संसदेत मंजूर झाल़े आता बिलाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पाठपुरवा सुरू केला आह़े हा देशपातळीवरचा प्रश्न आहे. राज्यपातळीवरही सक्षम लोकायुक्त येण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकत्र्यानी आता संघटीतपणो लढा देण्याची वेळ आली आहे. यासाठी गाव व तालुकास्तरापासून पुन्हा संघटन उभा करावे लागणार आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सक्षम लोकायुक्तसाठी आग्रह धरणार आह़े
यावेळी समितीचे राज्याचे विश्वस्त डॉ.शिवनाथ कुंभारे,अशोक सब्बन,बालाजी कोंपलवार यांनीही मार्गदर्शन केले. या शबिरात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे राज्यभरातील सदस्य सहभागी झाले आहेत़ शिबिरात संघटनेची पुढील वाटचाल,आगामी आंदोलने, लोकचळवळ याविषयी विचारमंथन होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
च्जनशक्तीच्या दबावातून अनेक वर्षे रखडलेले लोकपाल बील संसदेत मंजूर झाल़े आता बिलाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून पाठपुरवा सुरू केला आह़े हा देशपातळीवरचा प्रश्न आहे, असे मत हजारे यांनी मांडले
च्यासाठी गाव व तालुकास्तरापासून पुन्हा संघटन उभा करावे लागणार आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सक्षम लोकायुक्तसाठी आग्रह धरणार आहे, असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.