अंकित तिवारीची बलात्काराच्या आरोपातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 06:18 IST2017-04-28T03:41:12+5:302017-04-28T06:18:22+5:30
प्रसिद्ध गायक अंकित तिवारी याची गुरुवारी सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून सुटका केली.

अंकित तिवारीची बलात्काराच्या आरोपातून सुटका
मुंबई : प्रसिद्ध गायक अंकित तिवारी याची गुरुवारी सत्र न्यायालयाने बलात्काराच्या आरोपातून सुटका केली. लग्नाचे आमिष देऊन अंकित तिवारीने २०१२-१३ मध्ये आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका मॉडेलने केला होता.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता न्यायालयात दोनदा साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आले. दुसऱ्यांदा तिने साक्ष बदलल्याने वकिलांनी तिला ‘फितूर’ घोषित केले. तर ^‘सरकारी वकिलांनी आरोप सिद्ध करण्यासाठी डॉक्टरांची साक्ष नोंदवली नाही. दोषारोपपत्रात ११ साक्षीदारांची नावे होती. परंतु, त्यापैकी चारच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली,’ अशी माहिती तिवारीचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिली. (प्रतिनिधी)