अंकित तिवारीला 'आशिकी' भोवली, बलात्कार प्रकरणी अटक
By Admin | Updated: May 8, 2014 14:15 IST2014-05-08T12:16:43+5:302014-05-08T14:15:28+5:30
गायक अंकित तिवारीला मुंबई पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली आहे.

अंकित तिवारीला 'आशिकी' भोवली, बलात्कार प्रकरणी अटक
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ८ - आशिकी २ या चित्रपटातील गाण्यांमुळे प्रसिध्द झालेला गायक अंकित तिवारी याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अंकितसह त्याचा भाऊ अंकुर तिवारीलाही पोलिसांनी अटक केली असून आज या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
वर्सोवा येथील एका तरुणीने अंकित तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पिडीत तरुणी ही अंकितची प्रेयसी असून अंकितने लग्नाचे आमीष दाखवत बलात्कार केल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणात अंकितचा भाऊ अंकुर यानेही दमदाटी केल्याचा पिडीत तरुणीचा आरोप आहे. याप्रकरणी तरुणीने वर्सोवा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तिवारी बंधूंना अटक केली आहे. आशिकी २ या चित्रपटातील 'सून रहा है तू' या गाण्याने गायक अंकित तिवारीला प्रसिध्दी मिळाली होती. साहेब बिवी और गँगस्टर, दो दुनी चार या चित्रपटांसह काही हिंदी मालिकांसाठीही त्याने पार्श्वगायन केले आहे.