अंजु सोनी यांची महामंडलेश्वरपदावर नियुक्ती
By Admin | Updated: January 20, 2015 23:49 IST2015-01-20T23:49:22+5:302015-01-20T23:49:22+5:30
अलाहाबाद येथील आखाडा परी या महिला आखाड्याच्या महामंडलेश्वरपदावर खामगाव येथील सुश्री अंजु लवकेश सोनी यांची नियुक्ती.

अंजु सोनी यांची महामंडलेश्वरपदावर नियुक्ती
खामगाव (जि. बुलडाणा) : प्रयागराज अलाहाबाद येथील आखाडा परी या महिला आखाड्यावर महामंडलेश्वरपदावर खामगाव येथील सुश्री अंजु लवकेश सोनी यांची नियुक्ती झाली आहे. श्री सर्वेश्वर महादेव वैकुंठ धाम मुक्तीव्दार प्रयागराज अलाहाबादच्या वतीने आखाडा परी हा महिला आखाडा चालविला जातो. या आखाड्याच्या प्रमुख शक्तीस्वरूपा जगद्गुरू शंकराचार्य स्वामी त्रिकालभवंता सरस्वतीजी महाराज या आहेत. त्या भारतातील पहिल्या महिला जगद्गुरू शंकराचार्य असून, या आखाड्याच्यावतीने सन २00७ पासून देशभरात सनातन हिंदु धर्माचे संरक्षण तथा प्रचार व प्रचारासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या विभुतींना महामंडलेश्वर पदावर नियुक्त करण्यात येते. महाराष्ट्रातून सुश्री अंजु सोनी यांच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब होऊन त्यांना महामंडलेश्वर पदावर नियुक्त करण्यात आले. याबाबतची घोषणा १८ जानेवारी रोजी प्रयागराज अलाहाबाद येथे आयोजित कार्यक्रमात आली. यावेळी ज्योतिष प्रज्ञा या उपाधीने अंजु सोनी यांना सन्मानित करण्यात आले.