शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
3
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
4
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
5
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
6
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
7
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
8
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
9
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
10
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
11
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
12
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
13
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
14
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
15
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
16
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
17
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
18
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
19
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
20
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 21:44 IST

Anjali Damania Dhananjay Munde : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना 'बेल्स पाल्सी' आजाराने ग्रासले आहे.

Anjali Damania Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होते. तो आजार बरा होत नाही, तेच त्यांना आणखी एका आजाराने ग्रासले. मुंडेंना 'बेल्स पाल्सी' हा आजार झाला आहे. सलग 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, अशी माहिती त्यांनी स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली आहे. दरम्यान, याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. गेल्या काही काळापासून त्यांचे वाल्मिक कराडबरोबर असलेल्या संबंधांमुळे विरोधक सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीतर मुंडेंविरोधात मोर्चा उघडला आहे. त्या दररोज मुंडेंवर भ्रष्टाचार/घोटाळ्याचे नवनवीन आरोप करत आहेत. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी धनंजय मुंडेंना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?अंजली दमानिया यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, 'धनंजय मुंडेंना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा. Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे. हा कधी स्ट्रेस मुळे व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच. (हा माझा विषय आहे म्हणून मी म्हणत आहे). माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे, त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येती साठी शुभेच्छा,' अशी पोस्ट त्यांनी केली.

धनंजय मुंडेंनी काय माहिती दिलेली?आपल्या आजाराबाबत माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले, 'माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचार सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईन,' अशी पोस्ट मुंडेंनी केली.

बेल्स पाल्सी आजाराबाबत जाणून घ्या...बेल्स पाल्सी ही एक मेंदूशी संबंधित म्हणजेच समस्या आहे, ज्यामध्ये चेहऱ्याची नस (फेशियल नर्व) कमजोर होते किंवा प्रभावित होते, त्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला तात्पुरता लकवा सदृश्य स्थिती निर्माण होते.  काहीवेळा चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंचे स्नायूही या आजारात बाधित होतात. ही तात्पुरती समस्या असल्यामुळे, रुग्ण काही दिवसांत बरा होतो. मंत्री धनंजय मुंडेदेखील लवकरच या आजारातून बाहेर येतील.

 

 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानियाSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराड