शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

“वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला”; विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:18 IST

Valmik Karad Surrender: वाल्मीक कराड शरण आल्यानंतर याबाबत शंका उपस्थित करत अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

Valmik Karad Surrender: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मीक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आला आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मीक कराड याचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मीक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले. वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे वाल्मीक कराड याने स्पष्ट केले आहे. यावर अंजली दमानिया आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करताना टीका केली आहे. 

वाल्मीक अण्णा कराड शरण आला अन् पोलिसांचा नाकर्तेपणा अधोरेखित झाला

शरण येणे किंवा आत्मसमर्पण करणे हा शब्दप्रयोग मीडिया वापरत आहे. या कृतीला आत्मसमर्पण हा शब्दप्रयोग होत असेल तर हा पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. कारण ज्या प्रकरणाने अधिवेशन गाजवले होते, आमदारांनी यावर भाष्य केले, सत्ताधारी पक्षातील  नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. त्यानंतर चौकशी संदर्भात उपायोजना केल्याचे सांगण्यात आले. मात्र शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र प्रसारित झाले. म्हणजे पोलीस सोडून सर्वांना सगळे काही माहिती होते, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

दरम्यान, वाल्मीक कराड शरण येण्याचा अखेर मुहूर्त मिळाला म्हणायचा. कारण मागील दोन दिवसापासून शरण येणार अशा बातम्या आपण ऐकत होतो. मात्र हा प्लॅनिंग करून शरण येण्याचा कट आहे. हे सर्व ऐकून थोडीशी गंमत वाटली. म्हणजे सर्व पोलीस यंत्रणा ही दोन दिवस त्यांच्या टचमध्ये होती का? त्यांना कुठून समजले की शरण येणार आहेत? मला हे सर्व विचार करून त्रास होतो. गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातच होता आणि तो सीआयडी, पोलिसांना  मिळाला नाही. दोन दिवस झाले पोलिसांना कळते की, तो सरेंडर होणार आहे. म्हणजे वाल्मीक कराडसारख्या माणसाला राजकीय सरातून पाठबळ मिळत आहे हे त्यातून स्पष्ट होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मिक कराडSushma Andhareसुषमा अंधारेanjali damaniaअंजली दमानिया