पोलीस अधीक्षकपदी अनिल पारसकर

By Admin | Updated: January 6, 2017 04:09 IST2017-01-06T04:09:41+5:302017-01-06T04:09:41+5:30

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे.

Anil Paraskar as the Superintendent of Police | पोलीस अधीक्षकपदी अनिल पारसकर

पोलीस अधीक्षकपदी अनिल पारसकर

अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मोहमंद सुवेझ हक यांची पुणे जिल्हा ग्रामीण येथे बदली झाली. सुवेझ हक यांच्या जागी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची बदली झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. राज्याच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील आणि भारतीय पोलीस सेवेतील सुमारे २० पोलीस उपायुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत.
सुवेझ हक यांनी नक्षली विभागात चांगले काम केले होते. ते नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यामुळे त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी एक वर्ष आठ महिने काम पाहिले. हक हे गुरु वारीच पुणे येथे रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Anil Paraskar as the Superintendent of Police