शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक..."; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 09:46 IST

मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sachin Waze On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अशातच आता मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असे सचिन वाझेने म्हटलं आहे.

मुंबई पोलीस दलातून बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेने पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केला. सचिन वाझेनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप वाझेने केला. 

अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या तुरुंगात आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुखांना सचिन वाझेने अडचणीत आलं आहे. सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सचिन वाझेला रुग्णालयात नेत असताना त्याने ‘एएनआय’ला दिलेल्या प्रतिक्रियेत देशमुखांवर गंभीर आरोप केले.

“जे काही घडलं आहे त्याचे सर्व पुरावे आहेत. ते (अनिल देशमुख) त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत ‘सीबीआय’कडेही पुरावे आहेत. मी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे. हे सर्व प्रकरण (अनिल देशमुख) त्यांच्या विरोधात गेलेलं आहे. तसेच मी या प्रकरणात नार्को टेस्ट करायलाही तयार आहे. मी एक लेटर लिहिलं आहे, त्यामध्ये जयंत पाटील यांचंही नाव आहे”, असे सचिन वाझेने म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख आणि सचिन वाझेने केलेल्या आरोपांना राजकीय आणि कायदेशीर किनार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाझेचे आरोप नवीन नाहीत असं म्हटलं आहे. "अनिल देशमुख जेव्हा आत गेले तेव्हा त्यांचे पीएदेखील आत गेले. यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख, उद्धव ठाकरे यांची गँग सत्तेत असताना जनतेची लूट करत होती. वसुली करणे हेच या लोकांचे काम होतं. १२ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी गोंधळ घातला होता. वाझेनी काहीही नवे सांगितले नाही. उद्धव ठाकरेंना वाझे कशाला भेटत होते याचाही खुलासा व्हायला हवा, असे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsachin Vazeसचिन वाझे