शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुखांवर खासगी रुग्णालयात उपचार नकाे; ईडीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:35 IST

देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे दाखल केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली होती. त्यांचा खांदा निखळण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि भविष्यात शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईडीने म्हटले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी विरोध केला. जे. जे. रुग्णालयातही देशमुख यांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच उपचार मिळतील, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

देशमुख यांच्यावर उपचार केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, परंतु आपत्कालीन परिस्थितीत तसे करण्याची गरज नाही, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले. आपल्या निवडीच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे, हा मंत्र्यांचा अधिकार आहे, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील अनिकेत निकम यांनी केला. त्यावर न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय मंगळवारपर्यंत राखून ठेवला. 

देशमुख यांना खांद्याच्या दुखण्यामुळे दाखल केलेल्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली होती. त्यांचा खांदा निखळण्याचा दीर्घ इतिहास आहे आणि भविष्यात शस्त्रक्रिया करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ईडीने म्हटले आहे.

‘’त्यांच्या (देशमुख यांच्या) वेदना कमी होत नसल्याने त्यांना जे. जे. हॉस्पिटलने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. देशमुख यांची ही शस्त्रक्रिया रुग्णालयात व त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे करण्याची इच्छा आहे. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या हृदयाच्या स्थितीवरही लक्ष ठेवावे लागेल’’, असा युक्तिवाद निकम यांनी केला. 

न्यायालयातील युक्तिवाददेशमुख यांना खासगी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. ते जे. जे. रुग्णालयातच उपचार घेऊ शकतात, असे ईडीने म्हटले. जर देशमुख खासगी रुग्णालयाचा खर्च करण्यास तयार असतील, तर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आग्रह करू शकत नाही, असे निकम यांनी म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnil Deshmukhअनिल देशमुख