शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनिल देशमुख प्रकरण : कागदपत्रांचा वाद सामंजस्याने सोडवू, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 08:59 IST

अनिल देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा आणि सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांचा काहीही संबंध नाही, असा दावा राज्य सरकारने यापूर्वी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात तपास करण्यासाठी सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांवरून निर्माण झालेल्या वादावर सामंजस्याने तोडगा काढू, अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.

अनिल देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाचा आणि सीबीआयने मागितलेल्या कागदपत्रांचा काहीही संबंध नाही, असा दावा राज्य सरकारने यापूर्वी केला आहे.अनिल देशमुख यांच्या तपासाशी संबंधित असलेली कागदपत्रे देण्यास राज्य सरकार तयार नाही. सरकार सीबीआयला तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस.एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

न्यायालयाने गेल्या सुनावणीत राज्य सरकारला याबाबत पुनर्विचार करून ते सीबीआयला कागदपत्रे देण्यास तयार आहेत की नाही, हे सांगण्याचे निर्देश दिले होते.मंगळवारच्या सुनावणीत राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांनी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. आमच्यात समेट होईल, अशी आशा आम्ही करत आहोत.अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे दादा यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील बदल्या व नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत काही महत्त्वाचा दस्तावेज पोलीस महासंचालकांपुढे सादर केला होता. अनिल देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत. ती कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावी, यासाठी स्टेट इंटेलिजन्स विभागाला पत्र लिहिले. मात्र, त्यांनी अन्य एका तपासासाठी या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असे म्हणत ती देण्यास नकार दिला, असे सीबीआयने याचिकेत म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २२ जुलै रोजी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत न्यायालयाने सीबीआय पोलीस नियुक्त्या व बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा तपास करू शकते, असा निर्वाळा दिला होता. २१ एप्रिल रोजी सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHigh Courtउच्च न्यायालय