शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

याचिकेमागचे ‘कर्ते धर्ते’ अनिल देशमुख; समन्स रद्द करण्यासाठीची याचिका, सीबीआयचा उच्च न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 12:48 IST

सप्टेंबर महिन्यात सीबीआयने सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना समन्स बजावून दिल्लीच्या सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. राज्य सरकारने या समन्सना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

मुंबई  : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचारप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना सीबीआयने बजावलेले समन्स रद्द करण्यास राज्य सरकारने केलेली याचिका सरोगेटेड आहे. या याचिकेचे कर्तेधर्ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत, असा आरोप सीबीआयने मंगळवारी उच्च न्यायालयात केला.सीबीआयचा तपास खोडण्यासाठी व दिशाभूल करण्यासाठी राज्य सरकारने समन्स रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली, असा युक्तिवाद सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अमन लेखी यांनी न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे केला. देशमुख गृहमंत्री असताना महाराष्ट्र पोलीस आस्थापन मंडळाने पोलीस नियुक्त्या बदल्यांसंदर्भात केलेल्या शिफारशी खोडून काढल्या, हे सिद्ध करणारे पुरावे सीबीआयकडे आहेत, असे लेखी यांनी सांगितले.‘पोलीस मंडळाच्या अनेक शिफारशी मंजूर केल्या नाहीत, निर्णय बदलण्यात आले आणि अनेक बदल्या आणि नियुक्त्या मंडळाच्या सहभागाशिवाय केल्या, हे दाखवणारे अनेक पुरावे सीबीआयने गोळा केले. हा संपूर्ण भाग देशमुख यांच्या भूमिकेभोवती फिरतो. देशमुख यांनी दिलासा मिळवण्यासाठी न्यायालयात अनेकदा याचिका केली. पण, त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता राज्य सरकार त्यांच्यावतीने पुढे आले आहे. ही सरोगेट याचिका आहे. त्यामागे ‘खरे हिरो’ अनिल देशमुख आहेत,’ असा युक्तिवाद लेखी यांनी केला. तर पांडये यांना परमबीर सिंह यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या चौकशीसाठी  त्यांना समन्स बजावले, असे लेखी यांनी न्यायालयाला सांगितले.

२४ नोव्हेंबरला हाेणार पुढील सुनावणीसप्टेंबर महिन्यात सीबीआयने सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना समन्स बजावून दिल्लीच्या सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. राज्य सरकारने या समन्सना उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवरील सुनावणी २४ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागHigh Courtउच्च न्यायालय