शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: ईडीसमोर जाताना अनिल देशमुख यांचं ट्वीट, म्हणाले, 'माझ्यावर आरोप करणारे पळून गेले, मी मात्र ईडीला सहकार्य करणार' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 13:34 IST

Anil Deshmukh in ED Office : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आणि १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झालेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर झाले. दरम्यान, ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ ट्विट करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच आपल्यावर आरोप करणारे परमबीर सिंह हे परदेशात पळून गेले आहेत. मी मात्र ईडीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे, असे म्हटले आहे.

या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले की, नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचे समन्स आले तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो की, जेव्हा जेव्हा मला ईडीचे समन्स आले तेव्हा, मी ईडीला कळवले की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आला की मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर होईन. ईडीने जेव्हा आमच्या सर्व घरांवर छापे टाकले तेव्हा मी, माझ्या कुटुंबाने, सहकाऱ्यांनी त्यांना सहकाऱ्यांनी सहकार्य केले. ,सीबीआयची दोनदा समन्स आली. तेव्हा मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात गेलो आणि जबाब नोंदवला.

या व्हिडीओमध्ये अनिल देशमुख पुढे म्हणाले की, अजूनही माझा खटला सुप्रिम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात आलो आहे. आपल्याला माहिती आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ज्या परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केलेत ते परमबीर सिंह आज कुठे आहेत. याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. त्या बातम्यांनुसार परमबीर सिंह भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. म्हणजे ज्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केला. ते आरोप करणारे पळून गेले. आज परमबीर सिंह यांच्याविरोधात त्यांच्या खात्यातील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांनी गुन्हे दाखल केलेले आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले.

तसेच परमबीर सिंह यांचा सहकारी असलेल्या सचिन वाझे यानेसुद्धा त्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले होते. आज सचिन वाझे हा खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. सचिन वाझे हा त्याआधीही अनेकदा तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेला पोलीस खात्यातून काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मी त्याला सरकारी नोकरीतून काढल्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले. अशा या परमबीर सिंह आणि सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवरून माझी जी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला जो त्रास दिला जात आहे. त्याच्याबद्दल मला अतिशय दु:ख होत आहे. मी सरळ मार्गाने, नैतिकतेने चालणारा माणूस, ३० वर्षांच्या कारकिर्दीत माझ्यावर एकही आरोप झाला नव्हता. पण आज जे देश सोडून पळून गेले त्या परमबीर सिंह आणि तुरुंगात असलेल्या सचिन वाझे त्यांनी आज माझ्यावर केलेल्या आरोपांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी होत आहे, याचं मला अतिशय दु:ख आहे, अशी खंतही अनिल देशमुख  यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliticsराजकारण