शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे हत्या : एसआयटीची स्थापना करा; उपअधीक्षक दिपाली काळेंना सहआरोपी करा, याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:01 IST

अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी  सांगलीचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांची कालच बदली करण्यात आली आहे.  हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, सीआयडीचे डीआयजी आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी यांची मिळून एसआयटीची स्थापना करावी आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी या मागण्यांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. उद्या या मागण्यांसाठी सर्वपक्षीय कृती समितीचा सांगलीत मोर्चा आहे.  सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत दि. ६ रोजी पोलिसांच्या मारहाणीत लूटमारीच्या गुन्ह्यातील अनिकेत कोथळे या संशयिताचा मृत्यू झाला होता. पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्यास नग्न करुन उलटे टांगले व मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी सर्व पोलिसांना अटक करून सेवेतून बडतर्फ केले आहे. हा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे.या दरम्यान पोलिसांच्या ‘थर्ड डिग्री’विरुद्ध आणि काराभाराबद्दल सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला होता. मंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ अधिका-यांना सांगलीत यावे लागले. यापूर्वी तक्रारी असतानाही पोलिस उपनिरीक्षक कामटेवर कारवाई केली नसल्याचा आरोप करून विविध सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षक शिंदे यांच्या बदलीची मागणी केली होती, तर मृत अनिकेत कोथळेच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करण्याचा आग्रहही कोथळे कुटुंबियांसह सर्वपक्षीय कृती समितीने धरला आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी या दोघांबद्दलचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे.त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. २५) सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शिंदे आणि काळे यांच्या बदलीचा निर्णय घेतल्याचे समजते. गुरुवारी सायंकाळी तसे आदेश काढण्यात आले. 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगली