नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी
By Admin | Updated: August 20, 2016 02:06 IST2016-08-20T02:06:29+5:302016-08-20T02:06:29+5:30
काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊला अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. गुरुवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी
मुंबई : काँग्रेसचे आमदार नारायण राणे यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊला अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. गुरुवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना एक ते दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राणे यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर शुक्रवारी सकाळी त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या. अॅन्जिओग्राफी केल्यानंतर अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. मॅथ्यू यांनी अॅन्जिओप्लास्टी केली. ती यशस्वी झाल्यावर डॉ. जलील परकार यांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)