जे.जे.मध्ये भुजबळांवर अॅन्जिओग्राफी
By Admin | Updated: January 11, 2017 04:27 IST2017-01-11T04:27:33+5:302017-01-11T04:27:33+5:30
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अॅन्जिओग्राफी करण्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्याचा आदेश विशेष न्यायालयाने आर्थर रोड कारागृहाला दिला.

जे.जे.मध्ये भुजबळांवर अॅन्जिओग्राफी
मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची अॅन्जिओग्राफी करण्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्याचा आदेश विशेष न्यायालयाने आर्थर रोड कारागृहाला दिला.
बॉम्बे हॉस्पिटलमधून जे. जे. रुग्णालयात उपचाराकरिता आणल्यानंतर भुजबळांनी अॅन्जिओग्राफी करण्यास नकार दिला. त्यामुळे विशेष न्यायालयाने डिसेंबरमध्ये भुजबळांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्याचा आदेश दिला. तसेच अॅन्जिओग्राफी करण्यापूर्वी भुजबळांची व त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घ्या, असेही कारागृह प्रशासनाला सांगितले. (प्रतिनिधी)