दारूची बाटली ओतल्याचा राग; पतीचा गळफास
By Admin | Updated: January 3, 2017 04:55 IST2017-01-03T04:55:39+5:302017-01-03T04:55:39+5:30
थर्टीफर्स्ट साजरी करण्यासाठी आणलेली दारूची बाटली पत्नीने ओतून टाकली. त्या रागात पतीने गळफास घेऊन, स्वत:चे आयुष्य संपविल्याचा प्रकार कांदिवलीत शनिवारी घडला.

दारूची बाटली ओतल्याचा राग; पतीचा गळफास
मुंबई : थर्टीफर्स्ट साजरी करण्यासाठी आणलेली दारूची बाटली पत्नीने ओतून टाकली. त्या रागात पतीने गळफास घेऊन, स्वत:चे आयुष्य संपविल्याचा प्रकार कांदिवलीत शनिवारी घडला.
रामचंद्र यादव (३०) असे या मयत इसमाचे नाव आहे. जो व्यवसायाने चालक असून, एका खासगी कंपनीत काम करत
होता. कांदिवलीच्या दामूनगर परिसरात राहणारा यादव हा सतत आजारी असायचा. त्यामुळे
त्याची पत्नी त्याला दारू
पिण्यास विरोध करायची. शनिवारी म्हणजे, थर्टीफर्स्टच्या दिवशीदेखील तो घरी येताना सोबत दारूची
बाटली घेऊन आला, ज्याला त्याच्या
पत्नीने विरोध केला. तेव्हा त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.
समतानगर पोलीसांनी यादवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी
पाठविला. सुसाइड नोट
पोलिसांना सापडलेली नाही. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)