शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच, मानधनवाढीचा प्रस्ताव तयार; उद्या मुंडे व मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 05:03 IST

राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव बुधवारी तयार झाला आहे. या प्रस्तावावर महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा झाल्यानंतरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

मुंबई : राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव बुधवारी तयार झाला आहे. या प्रस्तावावर महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चर्चा झाल्यानंतरच तो मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मात्र तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी सांगितले की, महिला व बालविकास विभागाच्या सचिव आणि आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत कृती समितीचे शिष्टमंडळही उपस्थित होते. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत मानधनवाढीचे आकडे ठरवून प्रस्ताव तयार झाला. या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे नव्हत्या. त्यामुळे शुक्रवारी मुंडे यांच्यासह वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडला जाईल. संबंधित मंत्र्यांच्या मंजुरीनंतर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.मानधनवाढीचा प्रस्ताव तयार असून, दोन दिवसांत मुंडे आणि मुनगंटीवार यांच्याकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री निर्णयाची घोषणा करत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.शासन बोझा कसा उचलणार?राज्यातील सुमारे २ लाख अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीमुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे ९०० कोटी रुपयांचा बोझा पडणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे....तर त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?मानधनवाढीसाठी संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनी अंगणवाड्यांना कुलूप लावले आहे. शिवाय स्तनदा माता आणि कुपोषित बालकांचा पोषण आहार वाटप आणि आरोग्य सेवाही बंद केल्या आहेत. परिणामी, या आंदोलनात एखाद्या बालकाचा किंवा मातेचा मृत्यू झाल्यास, त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.कुपोषित मुलांवरून चिखलफेकसरकार चर्चा करत असल्याने अंगणवाडी कर्मचाºयांनी संप मागे घेण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनीकृती समितीला केले आहे. मानधनवाढीसाठी कुपोषित बालके आणि स्नतदा मातांना कर्मचारी वेठीस धरत असल्याचा आरोप सचिवांनी केला आहे.   मानधनवाढीसाठी कुपोषित बालके आणि स्नतदा मातांना कर्मचारी वेठीस धरत असल्याचा आरोप सचिवांनी केला आहे. मात्र वर्षभरापूर्वीच मंजूर झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी संप करावा लागत असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. मुळात तीन महिन्यांपूर्वीच संपाची नोटीस दिल्यानंतरही शासनाने निर्णय घेतला नाही.त्यामुळे शासनच संपाला जबाबदार असल्याचा प्रत्यारोप कृती समितीने केला आहे. त्यामुळे शासन आणि कर्मचाºयांच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कुपोषित मुलांसह स्तनदा मातांचा जीव टांगणीला लागला आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPankaja Mundeपंकजा मुंडेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार