Andheri East By Election Result Update: विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:00 PM2022-11-06T14:00:00+5:302022-11-06T14:01:09+5:30

Rutuja Latke Won by 65335 Votes: रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे दोनवेळा आमदार होते. २०१४ मध्ये लटकेंना ५२८१७ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ६२७७३ मते मिळाली होती.

Andheri East By Election Result Update: Rutuja Latke Won By huge Margin; Also break husband Ramesh latke's Vote Count of 2019  | Andheri East By Election Result Update: विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले

Andheri East By Election Result Update: विजयी! ऋतुजा लटकेंनी पतीचाही विक्रम मोडला; अपक्षांचे डिपॉझिटही जप्त केले

Next

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत. ऋतुजा यांनी केवळ बहुमतच नव्हे तर रमेश लटके यांचा विक्रम मोडला आहे. रमेश लटकेंपेक्षा जास्त मते मिळवून ऋतुजा यांनी विजय मिळविला आहे. 

रमेश लटके हे अंधेरी पूर्वचे दोनवेळा आमदार होते. २०१४ मध्ये लटकेंना ५२८१७ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ६२७७३ मते मिळाली होती. आज ऋतुजा लटकेंनी पतीला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते मिळविली आहेत. रमेश लटकेंना २०१९ च्या निवडणुकीत 62773 टक्के मते मिळालेली. अपक्ष मुरजी पटेल यांना 45808 मते मिळालेली. काँग्रेसच्या अमीन कुट्टी यांना 27951 मते पडलेली. तर नोटाला 4311 मते मिळालेली.

ऋतुजा लटके यांनी अठराव्या फेरीतच 65335 मते मिळविली आहेत. तर नोटाला 12691 मते पडली आहेत. त्यापाठोपाठ राजेश त्रिपाठी यांना 1550 मते मिळाली आहेत. सतराव्या फेरीअखेर ऋतुजा यांना 61956 मते मिळाली होती. 

शेवटच्या फेरीत ऋतुजा लटके यांना ६६२४७ मते मिळाली. तर नोटाला १२७७६ मते मिळाली. 

अठराव्या फेरीतील मतमोजणी....

१) ऋतुजा लटके- ६६२४७

२) बाला नाडार - १५०६

३) मनोज नायक - ८८८

४) नीना खेडेकर- १५११

५) फरहाना सय्यद- १०८७

६) मिलिंद कांबळे- ६१४

७) राजेश त्रिपाठी- १५६९

आणि 

नोटा - १२७७६

एकूण मते : ८६१९८

Web Title: Andheri East By Election Result Update: Rutuja Latke Won By huge Margin; Also break husband Ramesh latke's Vote Count of 2019 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.