शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे

By admin | Published: September 06, 2015 4:59 AM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा

अंदमान : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी साहित्य, राजकारणात गाठलेली उंची आपण गाठू शकणार नाही. मात्र, आजच्या राजकारणी व साहित्यिकांनी अशी उंची गाठण्याचा निदान प्रयत्न तरी करावा, अशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. अंदमान हे राष्ट्रप्रेमाचे तीर्थक्षेत्र झाले पाहिजे. येथे जगभरातील पर्यटकांना खुणावेल असे स्मारक उभारण्यात येत असेल तर सेनेचे त्याला पूर्ण समर्थन असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोरे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आदी उपस्थित होते. सावरकर हे साहित्यिक आणि राजकारणीदेखील होते. या दोहोंमध्ये त्यांनी मोठी उंची गाठली. याचा आपण मानसन्मान राखला पाहिजे. त्या उंचीचे साहित्य निर्माण होण्याबरोबरच तसेच राजकारणही व्हायला हवे, असे सांगून ठाकरे म्हणाले, सावरकरांच्या काव्यपंक्ती काढण्याचा नतद्रष्टपणा काँग्रेस सरकारने केला. इतिहासाकडे बघा म्हणणारे अशा वेळी इतिहासाकडे डोळेझाक करतात. डॉ. शेषराव मोरे म्हणाले, सावरकरांवरील अभ्यासामुळे मला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. अंदमान हे एकेकाळी भयंकर शिक्षेचे नाव होते. आता ते स्वातंत्र्याचे प्रतिक बनले आहे. मात्र, भारतातीलच काही दुष्ट बुद्धीचे आणि कृतघ्न लोक ओरडतात की सावरकरांनी येथून सुटण्यासाठी ब्रिटिशांकडे दयेचा अर्ज का केला? दोन जन्मठेपांची नरकमययात्रा भोगणाऱ्यांनाच हा अधिकार आहे, अशा नतदृष्टांना नाही. महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आज दिल्लीवर प्रभाव राहिला नाही, तसाच साहित्यिकांचाही नाही. बुध्दीमता, संशोधकता आणि प्रतिभा असूनही इंग्रजी भाषेच्या ज्ञानात मराठी साहित्यिक कमी पडतात. इतर भाषेतील साहित्यिक इंग्रजीत लिहितात किंवा मातृभाषेतील लिखाणाचा स्वत:च अनुवाद करतात, असे सांगून ते म्हणाले, मराठीला ज्ञानपीठ मिळण्यास उशीर झाला याचे कारणही इंग्रजीचे ज्ञान नाही, हेच आहे. ज्याची इंग्रजी उत्तम होती, त्याला ते लवकर मिळाले, हे देखील आपण पाहिले आहे. अखिल भारतीय स्पर्धेत उतरायचे असेल तर मराठी लेखकाने इंग्रजीतही पारंगत होणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालावे, असा नाही. पाचवी ते दहावीपर्यंत एक इंग्रजी विषय घेतला तरी त्यात पारंगत होता येते. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्र शासनही इंग्रजी शाळांना उत्तेजन द्यायचे व मराठी शाळांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबत असल्याचे त्यांनी नमूद केले. संमेलनाला खासदार संजय राऊत, रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.साहित्यिकांविनाच साहित्यसंमेलनचौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला शनिवारी साहित्यिकांविनाच सुरुवात झाली. साहित्यिकांऐवजी राजकीय विशेषत: शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांचीच गर्दी होती. ग्रंथदिंडीने या संमेलनाला प्रारंभ झाला. सेल्युलर जेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी पावणेआठ वाजता ग्रंथदिंडी निघाली. शेषराव मोरे, सदानंद मोरे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्यासह साहित्य रसिक व सावरकरप्रेमी दिंडीत सहभागी झाले. मात्र, दिंडीत स्थानिकांना मानाचे स्थान देण्यात आले नाही. डॉ सदानंद मोरे वगळता कोणत्याही मुख्य साहित्यिकाचा दिंडीत समावेश नव्हता. गर्जा जयजयकार, गर्जा महाराष्ट्र माझा, जयोस्तुते.. यासह विविध गीते, कविता, एकनाथी भारुड म्हणत पारंपरिक वेशभूषा नि टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांनी अंदमाननगरी दुमदुमुन सोडली.ग्रंथदिंडीचा समारोप महाराष्ट्र मंडळ येथे स्वागताधक्ष व खासदार राहुल शेवाळे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत झाला. पुरोगामी दहशतवादाचे मराठी वैचारिकतेसमोर आव्हान‘हिंदू’ या शब्दाचा वापर करून आपण प्रतिगामी वा जातीयवादी तर ठरणार नाही ना, या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता आहे. हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी ठरू. हे पुरोगामी दहशतवादाचे आव्हान मराठी वैचारिकतेसमोर आहे, असे प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितले. आज खरेखुरे पुरोगामी त्यामुळे या संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. या पुरोगाम्यांनीच सावरकारांसारख्या विज्ञाननिष्ठाला ते केवळ हिंदूत्ववादी असल्याने प्रतिगामी ठरविले.