आणि नवाज शरीफ यांची काढली अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 19:38 IST2016-09-21T19:38:33+5:302016-09-21T19:38:33+5:30
जम्मू -काश्मीर मधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचे निषेधार्थ बुधवारी मलकापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानी पंतप्रधान नवाज

आणि नवाज शरीफ यांची काढली अंत्ययात्रा
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. २१ : जम्मू -काश्मीर मधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचे निषेधार्थ बुधवारी मलकापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे प्रतिकात्मक प्रेत तिरडीवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष नानासाहेब बाबर यांच्या नेतृत्वात स्थानिक बसस्थानकावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतिकात्मक पुतळा तिरडीवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.
तहसिल चौकात ही अंत्ययात्रा आल्यावर तिरडीवर असलेल्या शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास संतप्त मनसे सैनिकांनी चपलाजोड्यांनी बदडून काढत 'पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरीफ मुर्दाबाद' असे नारे देत अंत्यविधी उरकण्यात आला. तद्नंतर शहिद जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष निखिल चिम, शे.सम्मद कुरेशी, तालुकाध्यक्ष विश्वनाथ पुरकर, तालुका उपाध्यक्ष मोहन पाटील, पंकज पाटील, किशोर राऊत, प्रकाश मेहरा, किशोर गणबास, संदिप राजपुत, शाम संबारे, शरद खराटे, मंगल गणबास, संजय श्रीनाथ, संतोष सावरकर, राजु गणबास, सागर पाटील, उखर्डा तांदुळकर, बंडु लोहार, संजय कातव आदी उपस्थित होते.