पिंपरी : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच त्याच विधानाचा पुनरुच्चार करून विधानसभा निवडणूक लढविली. निकालानंतर ते पुन्हा आले पण अल्पावधीतच त्यांचे सरकार कोसळले.. आणि महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करून फडणवीस यांचे मी पुन्हा येईन''चे स्वप्न वास्तविकदृष्ट्या भंग पावले. मात्र तरीही त्यांनी चिंचवड येथे एका कार्यक्रमात मी पुन्हा येईन, पण... असे म्हणून सर्वांचीच उत्सुकता वाढविली.चिंचवड येथे कर्तव्य फाउंडेशन आयोजित मोरया युथ फेस्टिवल २०२० चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी राजकारण विरहित विषयांवर आणि त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.
... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 18:38 IST
तुम्हीच आमचे आजीव मुख्यमंत्री आहात, यापुढेही तुम्हीच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते..
... अन् देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन..!
ठळक मुद्दे''मोरया युथ फेस्टिवल २०२०'' चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते