...अन् पहिलवानाचा चोर झाला

By Admin | Updated: September 7, 2016 05:28 IST2016-09-07T05:28:27+5:302016-09-07T05:28:27+5:30

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी प्रियकराने मित्राच्या मदतीने तब्बल १३ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित प्रियकर संतोष दत्तात्रय पाटील

... and became the thief of the firstborn | ...अन् पहिलवानाचा चोर झाला

...अन् पहिलवानाचा चोर झाला

कोल्हापूर : प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी प्रियकराने मित्राच्या मदतीने तब्बल १३ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित प्रियकर संतोष दत्तात्रय पाटील (२६), मित्र नारायण कल्लाप्पा भोगण (३१) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीच्या ११ गाड्या जप्त केल्या आहेत.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरातून मोटारसायकलीची चोरी झाली होती. पोलिसांना खबऱ्याकडून संतोष पाटील हा मोटारसायकली चोरत असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फूटेजवरून संतोष संशयितरीत्या फिरताना दिसून आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ४ सप्टेंबर रोजी संतोष याच्यासह मित्र नारायण भोगण यांना अटक केली.
संतोषचे एका तरुणीवर प्रेम आहे. तिला भेटवस्तू देण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. यामुळे नारायण भोगणच्या मदतीने तो कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरू लागला. चोरलेल्या मोटारसायकली गावात आणून एकमेकींचे सुटे भाग बदलून १० ते १२ हजार रुपयांना विक्री करायचा. त्याने गावातच अशा नऊ दुचाकींची विक्री केली आहे. मिळालेले पैसे प्रेयसीवर खर्च करीत होता. नारायणला थोडेफार पैसे दिले की तो दारूसाठी खर्च करीत असे, अशी कबुली संतोषने पोलिसांना दिली. या दोघांवर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. (प्रतिनिधी)

Web Title: ... and became the thief of the firstborn