...आणि अमिताभ यांनी मुलाखत सोडली अर्ध्यावर!
By Admin | Updated: April 27, 2017 15:53 IST2017-04-27T14:53:41+5:302017-04-27T15:53:39+5:30
समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती.

...आणि अमिताभ यांनी मुलाखत सोडली अर्ध्यावर!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - बॉलिवूडच्या दोन समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती. 70-80 च्या दशकात दोघेही सुपरस्टार होते. दोघांमध्येही चित्रपट मिळवण्याची स्पर्धा होती. पण ही स्पर्धा असली तरी, मैत्री देखील पक्की होती.
आजही या दोघांच्या मैत्रीची इंडस्ट्रीमध्ये चर्चा होते. आज जेव्हा अमिताभ बच्चन यांना विनोद खन्ना यांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा ते सरकार 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. मित्राच्या निधनाची बातमी समजताच अमिताभ यांनी मुलाखत अर्ध्यावर सोडली आणि खन्ना कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अस वृत्त बॉलिवूडपापा डॉट कॉमने दिले आहे.
अमिताभ आणि विनोद खन्ना यांनी अमर, अकबर, अँन्थनी, मुकद्दर का सिकंदर, परवरिश आणि अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. रुपेरी पडद्यावर दिसणा-या या मैत्रीचा बंध पडद्यामागेही तितकाच घट्ट होता.