शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

मेथी गावातील पुरातन नागरशैली मंदिरे देतात यादव काळाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 05:54 IST

गावात एकाच पद्धतीची चार मंदिरे: १० ते १३ व्या शतकादरम्यान उभारल्याचा अंदाज

भिका पाटीलशिंदखेडा - गावोगावी विविध देवदेवतांची मंदिरे असतात. काही गावांमध्ये हेमाडपंथीय मंदिरे आहेत. मात्र, त्यांची संख्याही अत्यंत कमी असते. परंतु, शिंदखेडा तालुक्यातील अवघ्या साडेसात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या मेथी या गावात नागरशैली पद्धतीची एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल चार मंदिरे आहेत. एका छोट्या गावात एकाच पद्धतीची मंदिरे असणे हे विशेष असून, आजही ही मंदिरे तत्कालीन वास्तुरचनेची साक्ष देत आहेत.

देशात पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोनार्व येथील कोनार्व मंदिर (ओडिशा), सोमनाथ मंदिर (गुजरात) ही मंदिरे नागरशैलीची मंदिरे आहेत. आकाशाकडे झेपावणारी, उंच पद्धतीची अशी या मंदिराची रचना असते. अगदी त्याच पद्धतीने मेथी गावातही नागरशैलीची मंदिरे आहेत. या गावाच्या पूर्वेला भवानी व बालाजी, पश्चिमेला विष्णू आणि हरिया ही मंदिरे आहेत. मेथी येथे यादवकाळात म्हणजे १० ते १३ व्या शतकादरम्यान ही मंदिरे बांधण्यात आलेली असल्याचे जाणकार सांगतात. बालाजी मंदिरास बालाजी मंदिर म्हणून ओळखतात. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते नारायण, अनंतशयन वगैरे नावानेही संबोधले आहे.

गर्भगृहाच्या द्वारशाळेतील वैष्णव द्वारपालावरून आणि आडव्या प्रस्तावावरून गरुडाच्या शिल्पावरून हे  विष्णू मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. साधारणत: १२ फूट उंच अशा मजबूत जोत्यावर ते अधिष्ठित आहेत. सात ते आठ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या मंदिराच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे आहेत. मुख्य मंडप व उपमंडप किंवा कठड्यांनी सुरक्षित व सुशोभित आहे. बालाजी मंदिरास लागूनच भवानी मंदिर आहे. मंदिराचे पूर्वेकडे तोंड आहे. गर्भगृह अंतराळ, गूढमंडप आणि मुखमंडप आहे. ते ११ फूट उंच अशा जोत्यावर अधिष्ठित आहे. येथील दगडावरील कोरीव काम नजरेत भरण्यासारखे आहे. 

अशी आहे रचनाहरिया मंदिर गावाच्या दक्षिणेस नदीच्या पलीकडे आहे. स्थानिक लोकांना हरिया म्हणून परिचित असलेले विष्णूचे मंदिर जगतीवर अधिष्ठित आहे. मंदिराची रचना गर्भगृह, मंडप, अंतराळ, उपगर्भगृहे, मुखमंडप आणि समोरच गरुड मंडप अशी आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. विष्णू मंदिर मध्यभागी बारव आणि सभोवताली फक्त गर्भगृह असलेली छोटी छोटी एका खोलीची ही मंदिरे आहेत. मंदिरास पूर्व दिशेने प्रवेश आहे. पूर्वी येथे मोठमोठी झुडपे होती. साफसफाई करून मंदिराचा ओटा मोकळा केला आहे. यादव काळात मेथी हे वैष्णव धर्मियांचे श्रद्धास्थान होते. तसेच यादव राजा कृष्ण याचा राजाश्रय मेथीच्या मंदिर निर्मितीस लाभला, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केवळ मेथीयेथेच सुंदर मूर्ती पाहावयास मिळतात.