अनंत अंबानीने वजन ७० किलोने घटवले
By Admin | Updated: March 20, 2016 13:23 IST2016-03-20T13:23:52+5:302016-03-20T13:23:52+5:30
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने आपले वजन निम्म्याहून अधिक म्हणजे ७० किलोने घटवले आहे.

अनंत अंबानीने वजन ७० किलोने घटवले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - आपल्या लठ्ठपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने आपले वजन निम्म्याहून अधिक म्हणजे ७० किलोने घटवले आहे.
शनिवारी अनंत सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आला तेव्हा त्याला बारीक झालेला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आयपीएल स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत खुर्चीवर बसलेला अनंत नेहमीच सगळयांना दिसतो.
मागच्या काही महिन्यात अनंतने आपले वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जामनगरमधील रिलायन्स रिफायनरीमध्ये अमेरिकन फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली अनंतने आपले वजन घटवले. अनंतला दोन भावंडे आहेत. आकाश आणि इशा. अनंतला क्रिकेटची आवड असून त्याचा अध्यात्माकडे ओढा आहे.