शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, फक्त..." अरविंद केजरीवालांचे मोठे विधान
4
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
6
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
7
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
8
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
9
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
10
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
11
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
12
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
13
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
14
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
15
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
16
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
17
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
18
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
19
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
20
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय

Arnab Goswami : अमृता फडणवीसांनी अर्णब गोस्वामींसाठी केलं "हे" ट्विट, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2020 1:44 PM

Arnab Goswami And Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आहे.

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे" असं म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी यांचं कौतुक केलं आहे. "बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच  ArnabGoswami, MaharashtraGovt, Death Of Democracy हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य – शिवसेना

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, सबळ पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात, ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कोणावरही सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 

“आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”

भाजपाने कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यात भाजपाविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnvay Naikअन्वय नाईकMaharashtraमहाराष्ट्रArrestअटकarnab goswamiअर्णब गोस्वामी