शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Amruta Fadnavis : 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 16:59 IST

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत.

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. 8 मार्च रोजी महिला दिनी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. 

"जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला - कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.... तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी InternationalWomensDay हा हॅशटॅग देखील वापरला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता यांनी आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.

अमृता फडणवीसांचं Valentine गिफ्ट; ‘हे’ नवीन गाणं ऐकलंय का?

व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं होतं. ‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव होतं.

अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...

'झी म्यूझिक मराठी'च्या आगामी 'अंधार' या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ''डाव मांडते भीती'', असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत. अमृता फडणवीस देखील या गाण्याच्या व्हिडिओत दिसून येत आहेत. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

'ट्रोलर्स'चं केलं होतं स्वागत

अमृता फडणवीस याआधी त्यांच्या 'तिला जगू द्या', या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यावर अमृता फडणवीसांनी "मी नेहमी ट्रोलर्सचं स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणं थांबवणार नाही. माझं आणखी एक गाणं लवकरच येणार आहे", असं म्हटलं होतं. 

 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWomen's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला