शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजं; पुरुषोत्तम खेडेकरांचा महिलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 12:25 IST

तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे असं खेडेकर यांनी म्हटलं.

बुलढाणा - समाज हा घडत असतो, ते घडण्याचं केंद्र कुटुंब असते. व्यक्तीपासून कुटुंब आणि कुटुंबापासून समाज तयार होतो. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती शारिरीक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि अध्यात्मिक अंगाने परिपूर्ण होणार नाही. बालपणापासून मुलगा-मुलगी समानतेने वागवले जाणार नाही. एकाच मायेच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांमध्ये त्यांची आई फरक करते त्या मुलीनं तक्रार कुणाकडे करायची? दुसऱ्याकडून अपेक्षा करू नका. हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. तुम्ही अमृता फडणवीसांना रोल मॉडेल मानलं पाहिजे असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. 

पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, हुंडा बाप की माय कोण द्यायला सांगते, तर माय...जास्तीत जास्त बाबी महिलांनी स्वीकारल्या आणि बदलल्या तरच शक्य आहे. बदल हा महिलांच्या रक्तात आहे. किचनमध्ये दिवसाला बदल करत असतात. एवढे बदल वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात करत असता, मग तुम्हाला आवडत असताना तुम्ही का बदलत नाही? साधी टिकली रोज वेगवेगळी बदलली जाते. नवरा बदलू शकत नाही ही तुमची अडसर आहे, मला ते मान्य आहे. नाहीतर तोदेखील बदलला असता.महिलांनी ठरवलं तर समाजात बदल शक्य आहे असं त्यांनी म्हटलं. बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयातील ताराबाई शिंदे साहित्य नगरीत संमेलनाच्या आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

तसेच ज्या ब्राह्मण समाजातील महिलांनी अन्याय, अत्याचार झुगारून दिले.देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानली पाहिजे. विलासराव-शरद पवारांची पत्नी सोडली तर राजकारणात अमृता फडणवीस आहेत. ज्या देवेंद्र फडणवीस यांना केस कापायला जायचं असेल तर त्यांना विचारून जातात. तुम्ही तुमची स्वत:हून जोपर्यंत उंची वाढवणार नाही. तोपर्यंत दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवू नये हा स्त्रीवाद आम्हाला अपेक्षित आहे. हा प्रत्यक्षात आणावा. स्वत:तयार व्हा असंही पुरुषोत्तम खेडेकर यांनी महिलांना सांगितले. 

दरम्यान, जग बदलायचं तेव्हा बदलेल, बदलाची सुरुवात सर्वप्रथम कुटुंबाला विश्वासात घेऊन करा. आजही आम्ही बहुसंख्येने असलो तरी विषमतावादी, शौषणवादी, वर्ण वर्चस्ववादी वैदिक साहित्याचे हमाल म्हणूनच ओझे वाहत आहोत. धर्माची दारू, जातीची नशा, परधर्माचा टोकाचा द्वेष आपल्या उंबरठ्याजवळ आलाय अशा वेळी साहित्यिकांनी समाज परिवर्तनासाठी आपली लेखणी झिजवावी असं प्रतिपादनही खेडेकर यांनी संमेलनात केले. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसpurushottam khedekarपुरुषोत्तम खेडेकर