अमृता फडणवीस अपघातातून बचावल्या
By Admin | Updated: May 23, 2015 12:18 IST2015-05-23T11:18:21+5:302015-05-23T12:18:09+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या गाडीला काल रात्री भीषण अपघात झाला मात्र सुदैवाने त्या अपघातातून बचावल्या.

अमृता फडणवीस अपघातातून बचावल्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता एका भीषण अपघातातून बचावल्या. अमृता यांच्या इनोव्हा गाडीला आज काल लोअर परेल भागात एका सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीचेे बरेच नुकसान झाले असले तरीही सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही.
अमृता फडणवीस काल संध्याकाळी बँकेतून घरी परत येत असताना साडेसातच्या सुमारास त्यांच्या इनोव्हा गाडीला एका सिमेंट मिक्सरने धडक दिली. त्यात गाडीचे बरेच नुकसान झाले. अपघातानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, मात्र ट्रॅफिक जाम होऊन इतर नागरिकांना त्रास होऊ नये असा विचार करत अमृता यांनी कोणतीही तक्रार न नोंदवता तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.