अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’

By Admin | Updated: November 23, 2014 02:16 IST2014-11-23T02:16:46+5:302014-11-23T02:16:46+5:30

अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिगAल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले.

Amravati-Surat passenger leaves 'track' | अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’

अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’

बडनेरा (जि़ अमरावती) : अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिगAल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला. ही थरारक घटना बडनेरानजीक जंक्शन केबीनजवळ शनिवारी सकाळी 9  वाजता घडली. घटनेनंतर सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
अमरावती ट्रॅकवर नरखेड रेल्वे मार्गाच्या वळणानजीक जंक्शन केबीन आहे. येथून मालगाडय़ा किंवा प्रवासी गाडय़ा वळविल्या जातात. शनिवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी अमरावती मॉडेल स्थानकावरून अमरावती-सूरत पॅसेंजर बडनेराकडे रवाना झाली. पाच मिनिटात ही गाडी बडनेरा येथील जंक्शन केबीनजवळ आली. त्याचवेळी एक डिङोल इंजिन कॉड लाईनमार्गे नरखेड मार्गावरून वलगाव रेल्वे स्थानकाकडे जात होते. यामुळे जंक्शन केबीनजवळ या पॅसेंजरला ‘रेड सिगAल’ दाखविण्यात आला. परंतु याकडे चालक डी.के. सिंग यांचे लक्ष नसल्याने गाडी मुख्य अपलाइन सोडून सेंडम लाइनमध्ये उतरली आणि पोल नंबर 665 ए-3 र्पयत म्हणजे 73.2क् मीटर अंतरावर जाऊन थांबली. एकूण 13 डब्यांच्या या गाडीत भरगच्च प्रवासी होते. 
इंजिनला जुळलेली बोगीसुध्दा सेंडम लाइममध्ये शिरली होती. बडनेरा स्थानकावरील अधिका:यांनी जंक्शन केबीनमध्ये तैनात कर्मचा:यांना या घटनेची माहिती दिली. 
अपघाताच्या याप्रकारामुळे परिसरात घबराट पसरली होती. पोलीस प्रशासनाने लगेच घटना स्थळाचा ताबा घऊन चौकशी सुरू केली. (प्रतिनिधी)
 
चालक-सहचालक निलंबित 
अमरावती-सुरत पॅसेंजर अपघातानंतर चालक डी.के.सिंग व सहचालक एम.के.मलासपुरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. बडनेरा  स्थानकावर लोको इन्स्पेटक्टर अरविंद किनगे, आर.सी. अग्रवाल आणि आर.टी.कोटांगले यांनी या गाडीला बडनेरा स्थानकार्पयत नेले. चालक-सहचालक निलंबित झाल्याने बडनेरा स्थानकातील आर.के. साठे नामक चालकाला गाडीसह सुरतकडे रवाना करण्यात आले. 

 

Web Title: Amravati-Surat passenger leaves 'track'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.