अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’
By Admin | Updated: November 23, 2014 00:35 IST2014-11-23T00:35:09+5:302014-11-23T00:35:09+5:30
अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिग्नल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना

अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’
भीषण रेल्वे अपघात टळला
बडनेरा : अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिग्नल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना बडनेरानजीक जंक्शन केबीनजवळ शनिवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. घटनेनंतर सुमारे दोन तास या ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली होती.
अमरावती ट्रॅकवर नरखेड रेल्वे मार्गाच्या वळणानजीक जंक्शन केबीन आहे. येथून मालगाड्या किंवा प्रवासी गाड्या वळविल्या जातात. शनिवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून अमरावती-सूरत पॅसेंजर (गाडी क्र.५९०२६) बडनेऱ्याकडे रवाना झाली.
पाच मिनिटात ही गाडी बडनेरा येथील जंक्शन केबीनजवळ आली. त्याचवेळी एक डिझेल इंजिन कॉड लाईनमार्गे नरखेड मार्गावरून वलगाव रेल्वे स्थानकाकडे जात होते. यामुळे जंक्शन केबीनजवळ या पॅसेंजरला ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला.
चालक-सहचालक निलंबित
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती-सुरत पॅसेंजर अपघातानंतर चालक डी.के. सिंग व सहचालक एम.के. मलासपुरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. बडनेरा रेल्वे स्थानकावर लोको इन्स्पेटक्टर अरविंद किनगे, आर.सी. अग्रवाल आणि आर.टी. कोटांगले यांनी या गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत नेले. चालक-सहचालक निलंबित झाल्याने बडनेरा स्थानकातील आर.के. साठे नामक चालकाला गाडीसह सुरतकडे रवाना करण्यात आले.