अमरावतीत झोपडरपट्टीला भीषण आग, अनेक संसार उघडयावर
By Admin | Updated: December 31, 2015 09:06 IST2015-12-31T09:06:39+5:302015-12-31T09:06:39+5:30
अमरावतीच्या विलासनगर भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये वीसपेक्षा जास्त झोपडया जळून खाक झाल्या.

अमरावतीत झोपडरपट्टीला भीषण आग, अनेक संसार उघडयावर
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. ३१ - अमरावतीच्या विलासनगर भागातील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये वीसपेक्षा जास्त झोपडया जळून खाक झाल्या. या आगीमुळे अनेक संसार उघडयावर आले आहेत. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास इथे एका झोपडपट्टीमध्ये शॉर्टसर्कीट झाला आणि आग लागली.
ज्या झोपडीमध्ये शॉर्टसर्किट झाला त्याच झोपडीमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यामुळे ही आग वेगाने शेजारच्या झोपडयामध्ये पसरली. अन्य झोपडयांमधील सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीन रौद्ररुप धारण केले. एकापाठोपाठ एक जवळपास आठ ते दहा सिलिंडरचे स्फोट झाले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाला दीड़ तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये जिवीतहानी झाली नसली तरी, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत.