Amravati Municipal Election 2026 Eknath Shinde Shiv Sena: शिवसेना सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे. विरोधकांना सत्तेची लालसा आहे. पण आम्हाला मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. मी कमी बोलतो पण जास्त काम करतो. शिवसैनिकांना खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे. कोर्टात अडथळे आणले गेले तरी महिलांच्या ताकदीमुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले. महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री असते. नगरविकास मंत्री या नात्याने कचरा प्रकल्पावर निश्चित मार्ग काढला जाईल. अंडरग्राउंड वीजजाळे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि भक्कम रस्ते आम्ही देणार आहोत," असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
"अमरावती महापालिकेसाठी गार्डन विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भविष्यात आणखी तरतूद केली जाईल. रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाला आहे. अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला मतदान नाही, तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला होणार आहे," असेही शिंदे म्हणाले.
Web Summary : Eknath Shinde emphasized public service over power during Amravati election campaigning. He promised continued support for women's schemes, infrastructure development including roads, water, and underground electricity. He urged voters to choose development by supporting Shiv Sena's 'bow and arrow' symbol.
Web Summary : अमरावती चुनाव प्रचार में एकनाथ शिंदे ने सत्ता से ऊपर जनसेवा को बताया। उन्होंने महिलाओं की योजनाओं, सड़कों, पानी और भूमिगत बिजली सहित बुनियादी ढांचे के विकास के लिए समर्थन जारी रखने का वादा किया। उन्होंने मतदाताओं से शिवसेना के 'धनुष और तीर' चिन्ह का समर्थन करके विकास चुनने का आग्रह किया।