शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Amravati Lok sabha Election Result 2024: अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 18:51 IST

Amravati Lok sabha Election Result Update: महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे.

अमरावतीमधून मोठी बातमी येत आहे. पराभवाच्या छायेत असलेल्या भाजपाच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांनी पिछाडीवर असल्याने फेर मतमोजणीसाठी अर्ज केल्याचे समोर येत आहे. खासदार अनिल बोंडे यांनी ही माहिती दिली आहे. 

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नवनीत राणा यांना 470140  मते पडली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे (BALWANT WANKHADE) यांना 489464 मते मिळाली आहेत. राणा या सध्या 19324 मतांनी पिछाडीवर असून जवळपास पराभवाच्या छायेत आहेत. 

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आघाडी असताना भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून फेर मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मी आलो आहे असे बोंडे म्हणाले. पूर्ण निकाल आल्यानंतर त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत. आम्ही कोणत्या बुथवर कमी पडलो कोणत्या मतदारसंघात कमी पडलो हे पूर्ण पाहून आम्ही आत्मचिंतन करू, असे बोंडे यांनी म्हटले आहे. मतांचा फरक जर कमी असला व पोस्टल बॅलेटचे मत असल्यास फेरमतमोजनी करणे आवश्यक असते. त्यासाठी मी आलो असल्याचे बोंडे म्हणाले. 

बच्चू कडूंच्या पक्षाने राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. या उमेदवाराने राणांची 79445 मते घेतली आहेत. यामुळे राणांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे.  वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदा लोकसभा निवडणूक ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या या निर्णय महाविकास आघाडीला धक्का तर महायूतीला बळ देणारे ठरेल असा अंदाज वर्तविला जात होता. २०१९ मध्ये अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी ५६ हजारांच्या जवळपास मते घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. परंतु यंदा अमरावतीमधून प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी स्वत: रिपब्लिकन सेनेतून उमेदवारी दाखल केल्याने वंचितने त्यांना पाठिंबा दिला. तसेच बाबासाहेबांचा नातू म्हणून जिल्ह्यातील आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत राहील अशी आशा आनंदराज आंबेडकरांना होती. परंतु आंबेडकरांना 15843 मते मिळाली आहेत.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४navneet kaur ranaनवनीत कौर राणाamravati-pcअमरावतीbalwant wankhedeबळवंत वानखेडे