अमरावतीत डाळ साठेबाजावर धाड
By Admin | Updated: October 20, 2016 23:57 IST2016-10-20T23:57:34+5:302016-10-20T23:57:34+5:30
एमआयडीसी परिसरातील डाळ मिल मालकाने डाळीची साठेबाजी केल्याप्रकरणी महसूल विभागाने गुरुवारी उशिरा रात्री ११ वाजता धाड टाकली.

अमरावतीत डाळ साठेबाजावर धाड
>ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 20 - एमआयडीसी परिसरातील डाळ मिल मालकाने डाळीची साठेबाजी केल्याप्रकरणी महसूल विभागाने गुरुवारी उशिरा रात्री ११ वाजता धाड टाकली. चार गोडाऊन सील केले तर एक कोल्डस्टोरेज सील केले. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाने ही कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील मालपाणी फर्म, गोमती डाळ मिल मध्ये डाळ सील केली. चार गोडाऊन सील केले. ८०० क्विंटल डाळ पहिल्या टप्प्यात ताब्यात घेतली आहे. रात्रभर ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घटना स्थळी भेट दिली. तूर व चना डाळ जप्त करण्यात आली आहे. मिलमध्ये जास्त माल आढळला आहे. एका मिलमध्ये ३५०० किंटल डाळ साठवून ठेवण्याचा परवाना आहे. रजिस्टर मध्ये नोंदी तफावत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले