शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ५६ एड्सग्रस्त पुन्हा उपचाराच्या प्रवाहात, राज्यभरात जनजागृती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 18:02 IST

एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली.

- वैभव बाबरेकर 

अमरावती : एचआयव्ही पॉझिटिव्ह असणारे, पण औषधोपचार न घेणा-या ५६ पैकी २६ रुग्णांवर औषधोपचार सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अमरावती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने जुलैपासून शोधमोहीम राबविली. एड्सग्रस्तांच्या शोधासाठी राज्यभरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. काही एड्सग्रस्त उपचारापासून दूर पळत असल्याचे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आले. त्याअनुषंगाने प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी या मोहिमेची संकल्पना अमंलात आणली. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाकडे ५ हजार ८३० रुग्णांच्या नोंदी आहेत. त्यापैकी ४ हजार ८१९ जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ५६ रुग्ण आजपर्यंत उपचारासाठी आले नाही. त्यानंतर झालेल्या २४३ नोंदणीकृत रुग्णसुद्धा उपचारासाठी आलेच नाही. यापैकी काहींवर उपचार सुरूअसून, १६२ रुग्णांनी मध्येच उपचार सोडल्याचे निदर्शनास आले. १ जुलै ते ३१ आॅक्टोबरपर्यंत या मोहिमेत जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष व स्वयंसेवी संस्थामार्फत उपचार न घेणा-या एड्सग्रस्त रुग्णांची शोध घेतला. त्यावेळी २६ रुग्णांनी औषधोपचारासाठी होकार दर्शविला. पुढेही ही शोध मोहीम सुरू असून सर्वच रुग्णांना औषधोपचार देण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षातर्फे प्रयत्न सुरू आहेत. एड्सग्रस्त रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून असे रुग्ण आढळल्यास खासगी रुग्णालयाने ०७१२-२५५२११० या क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. 

रुग्णांच्या आक्रमक तेचे अनुभवएड्सग्रस्तांचा शोध घेताना सर्वप्रथम त्यांच्याशी टेलिफोनवर संपर्क करण्यात आला. त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन समुपदेशन करण्यात आले.   काही रुग्ण औषधोपचाराची तयारी दाखवीत होते, तर काही जण आक्रमक होत असल्याचे अनुभव शासकीय चमूसह स्वयंसेवी संस्थांना आला आहे. 

प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीने सरकारी मोहीम आहे, म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबियांसाठी उपचार घेणे गरजेचे आहे. ज्यांना माहिती पडले, त्यांनी संपर्क करावा. - अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य