मृत पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून हडपली रक्कम

By Admin | Updated: June 20, 2014 00:58 IST2014-06-20T00:58:45+5:302014-06-20T00:58:45+5:30

मृत पोलीस मित्राच्या बँक खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून ती हडप केल्याची घटना घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले गेल्या

The amount of strike from the dead police officer's account | मृत पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून हडपली रक्कम

मृत पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून हडपली रक्कम

आरोपी पीएसआय पसार : पत्नीच्या चौकशीसाठी पोलीस पथक मुंबईकडे
गडचिरोली : मृत पोलीस मित्राच्या बँक खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून ती हडप केल्याची घटना घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. गडचिरोली पोलिसांचे एक पथक त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या चौकशीसाठी मुंबई रवाना झाले आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील मारोतीनगरचे रहिवासी असलेले पोलीस उपनिरिक्षक प्रशांत देसाई हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते. २४ मार्च २०१२ ला नक्षल शोध मोहीम राबवून मालेवाडाकडून कुरखेडाकडे जाताना सी-६० पथकाच्या वाहनाला अपघात झाला. त्यात पीएसआय प्रशांत देसाई (२७) हे ठार झाले.
त्यापूर्वी देसाई व त्यांचे मित्र असलेले पीएसआय बरकले हे एकत्रच राहत होते. शिक्षण घेतानाही देसाई व बरकले हे एकाच खोलीत राहत. दोघेही एकाचवेळी पोलीस दलात दाखल झाले. देसार्इंच्या मृत्यूनंतर देसाईच्या बँक खात्यावर जमा झालेली रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे दुसऱ्या खात्यावर जमा होत असल्याची तक्रार मृत प्रशांत देसाईच्या कुटुंबीयांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याची चौकशी सुरू केली. मृत प्रशांत देसाई यांच्या खात्यातील रक्कम बरकले यांच्या पत्नी संजीवनी बोराडे यांच्या मुंबई येथील बँक खात्यावर जमा होत असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे.
इंटरनेट बँकिंगसाठी बँकेमध्ये जाऊन पासवर्ड घ्यावा लागतो. त्यासाठी बँक खातेदाराचे फोटो, ओळखपत्र लागते. मृतक प्रशांत देसाईचे बनावट ओळखपत्र बँकेत जमा करण्यात आले आहे. बँकेकडे पासवर्ड देताना मृतक प्रशांतच्या नावाने मोबाईल दिला गेला असावा, अशी शक्यता आहे. प्रशांत देसाई यांच्या खात्यातून बरकले यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झालेली रक्कम लगेच काढली जात होती. त्यानंतर या प्रकरणात संजीवनी बोराडे याही सहभागी असाव्यात, असे पोलीस तपासात दिसून आले आहे. या प्रकरणानंतर पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले हे सुटी न टाकता गायब झालेले आहे. तर गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पथक रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलीे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The amount of strike from the dead police officer's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.