शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या भू-भाड्याची रक्कम वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 02:34 IST

भू-भाड्याच्या रकमेवर १८% वस्तू व सेवा कर

मुंबई : एसटीच्या भू-भाड्यांच्या रकमेवर आता वस्तू आणि सेवा कर आकारण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस आणि परिवहन खात्याद्वारे जप्त केलेली वाहने एसटी आगारात पार्किंग केली जातात. या पार्किंग केलेल्या प्रतिवाहनावर भू-भाडे म्हणून ५० रुपये आकारले जातात. आता या ५० रुपये भू-भाड्यावर वस्तू आणि सेवा लागणार आहे. परिणामी एसटीच्या भू-भाड्यांची रक्कम वाढणार आहे. त्यानुसार, राज्यातील विभाग नियंत्रकांना या भू-भाड्याच्या रकमेत १८ टक्के वस्तू आणि सेवा कर एकत्र करून एकूण रक्कम वसूल करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत.वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागांच्या पथकांद्वारे राज्यभरातील अवैध वाहतूकीस आळा घालण्यासाठी तपासणी केली जाते. यामध्ये अवैध वाहनांवर कारवाई केली जाते. कारवाईदरम्यान अवैध असलेल्या वाहनांची पार्किंग एसटी महामंडळाच्या आगारात केली जाते. एसटी महामंडळाकडून भू-भाडे म्हणून प्रतिवाहन ५० रुपये आकारले जातात. ही रक्कम पार्किंग केलेल्या वाहन मालकांकडून वसूल करण्यात येते. आता या रक्कमेवर १८ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू होणार आहे. त्यानुसार ही रक्कम ५९ रुपये होणार आहे. ही रक्कम पार्किंग केलेल्या वाहन मालकांकडूनच वसूल करण्यात येईल.एसटीतून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडाची रक्कम वाढणार आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडले गेल्यास, दंडाच्या रकमेसह १८ टक्के वस्तू व सेवा करही भरावा लागणार आहे.एसटी महामंडळाने राज्यातील सर्व तिकीट तपासनिसांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे किमान १०० रुपयांच्या दंडावर १८ रुपयांचा कर आकारला जाणार आहे.

टॅग्स :state transportएसटीGSTजीएसटी