अंतिम टप्प्यातील कर्करोगावर क्रायोसर्जरीची मात्रा

By Admin | Updated: December 29, 2014 05:48 IST2014-12-29T05:48:34+5:302014-12-29T05:48:34+5:30

कर्करोग प्राथमिक अवस्थेत असताना निदान झाले तर तो पूर्णत: बरा होऊ शकतो. पण अंतिम टप्प्यातील कर्करोग बरा होऊन रुग्णाचे आयुष्य

The amount of cryosurgery in the final stage of cancer | अंतिम टप्प्यातील कर्करोगावर क्रायोसर्जरीची मात्रा

अंतिम टप्प्यातील कर्करोगावर क्रायोसर्जरीची मात्रा

मुंबई : कर्करोग प्राथमिक अवस्थेत असताना निदान झाले तर तो पूर्णत: बरा होऊ शकतो. पण अंतिम टप्प्यातील कर्करोग बरा होऊन रुग्णाचे आयुष्य पूर्ववत होण्याची शक्यता कमीच असते. पण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अंतिम टप्प्यातील कर्करोगदेखील बरा होण्याची शक्यता
वाढली असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
भारतात कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमो आणि रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो. पण नवीन संशोधनाप्रमाणे या पलीकडेही जाऊन कर्करोगावर उपचार करण्यासाठी क्रायो सर्जरीचा वापर केला जातो. कर्करोगावर उपचारासाठी क्रायो सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांचा वापर केल्यास त्या रुग्णाचा कर्करोग पूर्णत: बरा होऊ शकतो. पुन्हा कर्करोग होण्याचा धोकाही कमी
होत असल्याचे मत तज्ज्ञांनी
नुकत्याच कर्करोगावर झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले आहे.
चीनमध्ये वापरत असलेल्या अत्याधुनिक उपचार पद्धतीचा फायदा जगभरातील कर्करुग्णांना व्हावा, यासाठी मोफत आॅनलाइन सल्ला केंद्रदेखील सुरू करण्यात आले आहे. चीनमधील फूडा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी क्रायोसर्जरी, बॅकिथेरपी, इम्युनोथेरपीसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. या रुग्णालयानेच हे मोफत आॅनलाइन सल्ला केंद्र सुरू केले आहे. www.fu da hospital.in/ www.fudahospital.com  या संकेतस्थळावर मोफत सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Web Title: The amount of cryosurgery in the final stage of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.