शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम डीबीटीद्वारे, कृषीमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 17:12 IST

शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिल्या. गोंदिया, भंडाऱ्यात प्रायोगिक तत्वावर काम सुरू.

मुंबई : शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशा सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा फुंडकर यांनी सोमवारी घेतला.

खरीप हंगाम २०१७ मधील पीक विमा नुकसान भरपाईबाबत कार्यवाहीचा आढावा घेताना फुंडकर म्हणाले की, विमा कंपन्यांनी बँक स्तरावरील शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करुन घेऊन या याद्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावर जाहीर कराव्यात. नुकसान भरपाईस पात्र असलेला एकही  शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नुकसान भरपाईबाबतच्या प्रक्रियेला गती  द्यावी.

रब्बी 2016 हंगामातील 27 कोटी  56 लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली असून संबंधित कंपनीने विमा योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी व शेतकरीनिहाय नुकसानभरपाईचा तपशील असलेली माहिती पीक विमा पोर्टल आणि विमा कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी. तसेच कृषी विभागालाही नुकसानभरपाईच्या रक्कमेसह याद्या उपलब्ध करुन द्याव्यात.

पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर गोंदिया जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. दोन कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांमध्ये डीबीटीद्वारे नुकसान भरपाई जमा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, ते तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले. यावेळी खरीप 2018 च्या अनुषंगाने पीक विमा नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. 

याप्रसंगी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीPandurang Phundkarपांडुरंग फुंडकर