अमित शहांनी पुण्यात एकनाथ खडसेंच्या विषयावर बोलण्याचे टाळले

By Admin | Updated: June 5, 2016 13:46 IST2016-06-05T13:43:28+5:302016-06-05T13:46:28+5:30

पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणतेही भाष्य केले नाही.

Amit Shah stopped talking about Eknath Khadse's issue in Pune | अमित शहांनी पुण्यात एकनाथ खडसेंच्या विषयावर बोलण्याचे टाळले

अमित शहांनी पुण्यात एकनाथ खडसेंच्या विषयावर बोलण्याचे टाळले

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. ५ - पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी मोदी सरकारच्या विकास कामांचे दाखले दिले. 
 
भाजपाला देशातील करोडो युवकांना सोबत घ्यायचे आहे. मोदी सरकारने मागच्या ६८ वर्षात झाली नाही ती, कामे दोन वर्षात करुन दाखवली असा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. पुण्यात भाजपच्या कौशल्य विकास कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
कोळसा, वीज, कृषी क्षेत्रात २०१५ मध्ये मोठया प्रमाणावर उत्पादन झाले. युवकांसाठी स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा बँक अशा अनेक योजना आणल्या. तीन कोटी पेक्षा जास्त गॅस जोडण्या दिल्या. देश मजबूत हातांमध्ये सुरक्षित आहे. ७५० परदेशी कंपन्या भारतात कारखाने सुरु करत असून, त्यामुळे मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे असे त्यांनी सांगितले. 

Web Title: Amit Shah stopped talking about Eknath Khadse's issue in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.